जिल्हा परिषद शाळा होणार ‘डिजिटल’
By Admin | Published: April 7, 2016 12:11 AM2016-04-07T00:11:36+5:302016-04-07T00:25:10+5:30
आजरा तालुका : ९७ शाळांत डिजिटल वर्ग; पुढचा टप्प्यात ‘मोबाईल डिजिटल’ ही संकल्पना
परंडा : एका हॉटेल, लॉजिंगचा नवीन परवाना व एका हॉटेलच्या परवाना नुतनीकरणाचे काम तहसीलदारांकडून करून घेतो, असे म्हणत तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेतल्यानंतर परंडा तहसीलचे अव्वल कारकून अमोल सखाराम रांजणकर यांच्याविरुद्ध ‘एसीबी’ने धडक कारवाई केली़ ही कारवाई बुधवारी दुपारी परंडा तहसीलच्या आवारात करण्यात आली असून, या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील लोहारा शिवारातील गट नंबर २०५ मध्ये तक्रारदाराचे हॉटेल रेस्टॉरंट, फॅमिली गार्डन, परमिट रूम व लॉजिंग सुरू केले आहे़ याच्या परवाना नुतनीकरणासाठी तसेच परंडा शहराच्या शिवारातील गट नंबर २१२ मध्ये नव्याने सुरू केलेल्या हॉटेल व लॉजिंगच्या नवीन परवान्यासाठी तक्रारदाराने परंडा तहसील कार्यालयात फिस भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह रितसर अर्ज केला होता़ मात्र परवान्याचे काम तहसीलदारांमार्फत करून घेण्याच्या कामासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अमोल सखाराम रांजणकर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली़ पैशाची मागणी होताच तक्रारदाराने उस्मानाबादेतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती़ तक्रारदाराची तक्रार दाखल होताच उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी एसीबीचे अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी परंडा तहसीलच्या आवारात सापळा रचला़ तक्रारदाराच्या कामासाठी अव्वल कारकून अमोल रांजणकर यांनी १० हजार रुपयांची मागणी करून ते स्विकारल्यानंतर एसीबीने कारवाई केली़ या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रांजणकर यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)
मागील वर्षात लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने तब्बल ४१ जणाविरुद्ध सापळे रचून कारवाई केली होती़ तर मागील वर्षाप्रमाणेच चालू वर्षातही लाचखोरांविरूध्द एसीबीने धडक कारवाईसत्र हाती घेतले आहे़ चालू वर्षात आलेल्या १२ तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली आहे़ यात शिक्षण, महसूलसह पोलीस विभागातील लाचखोरीचा पर्दाफाशही एसीबीने केला आहे़ कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी होत असेल तर एसीबीच्या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे़