जिल्हा परिषदेतील शिपायाची आत्महत्या
By admin | Published: January 6, 2015 01:02 AM2015-01-06T01:02:21+5:302015-01-06T01:07:29+5:30
झाडाला घेतला गळफास : बिल्डरने फ्लॅट नावावर न केल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा
कसबा बावडा : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिपायाने आज, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कात्यायनी परिसरातील आपल्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रामचंद्र केंबळे (वय ५८, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे. बिल्डरने पैसे भागवूनही फ्लॅट नावावर न केल्याच्या नैराश्यातून केंबळे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी केंबळे हे माजी सैनिक असून, त्यांची शेती कळंबा-कात्यायनी परिसरात आहे. सध्या ते जिल्हा परिषदेमध्ये शिपाई पदावर नोकरीस होते. त्यांच्या शेतामध्ये सकाळपासून गवतकापणी सुरू आहे. ते पाहण्यासाठी जातो असे सांगून घरातून मोटारसायकलवरून ते निघून गेले. काही वेळाने त्यांनी आपल्या मुलग्याला गाडीची किल्ली हरविली असल्याचे सांगून ती घेऊन येण्यास सांगितले. किल्ली घेऊन मुलगा शेतामध्ये आला असता वडिलांनी चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या (पान १० वर)
नेत्रदानाचा संकल्प
शिवाजी केंबळे मनमिळावू स्वभावाचे होते. जिल्हा परिषदेमध्येही त्यांचे वर्तन साधे होते. त्यामुळे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या परिचयाचे होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यानंतर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवाजी केंबळे यांच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये बिल्डरच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही अथवा त्यांच्या नातेवाइकांनी तक्रार दिलेली नाही.
- दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे