जि.प. सदस्यांची दोघांनाही समान ‘ताकद’; २१ महाडिकांना, तर २० सदस्य मंडलिकांना मानणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:44 AM2019-03-18T00:44:25+5:302019-03-18T00:44:29+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची बांधणी करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद महत्त्वपूर्ण ठरते. ...

Zip Both of the members have the same 'strength'; 21 Mahadikas and 20 members in the circle | जि.प. सदस्यांची दोघांनाही समान ‘ताकद’; २१ महाडिकांना, तर २० सदस्य मंडलिकांना मानणारे

जि.प. सदस्यांची दोघांनाही समान ‘ताकद’; २१ महाडिकांना, तर २० सदस्य मंडलिकांना मानणारे

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची बांधणी करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सदस्यांचे बळ कोणाच्या मागे अधिक आहे, त्यावरच प्रचाराची यंत्रणा गतिमान होते.
सध्याचे बलाबल पाहिले तर कोल्हापूर मतदारसंघातील ४१ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २१ सदस्य धनंजय महाडिक, तर २० सदस्य प्रा. संजय मंडलिक यांना मानणारे असल्याने येथे काट्याची टक्कर पाहावयास मिळेल. ‘हातकणंगले’मधील ८ सदस्य खासदार राजू शेट्टी यांना, तर तब्बल १८ सदस्य धैर्यशील माने यांच्या प्रचारात सक्रिय होतील. कागदावर हे बलाबल दिसत असले तरी स्थानिक राजकारणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
लोकसभा मतदारसंघाचा पसारा फार मोठा आहे. सहा विधानसभेचे मतदारसंघ आणि १९ लाख मतदार संख्या आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात प्रत्येक गाव फिरायचे म्हटले तर उमेदवाराला शक्यच होत नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवर ज्या उमेदवाराचे संपर्क जाळे मजबूत त्याचे विजयाचे गणित अधिक सोपे राहते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.
कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक, तर शिवसेना-भाजप युतीकडून प्रा. संजय मंडलिक रिंगणात आहेत. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी आघाडीकडून खासदार राजू शेट्टी व शिवसेना-भाजप युतीकडून धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांत काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा पाठिंबा कोणाला राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोल्हापूर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४१ मतदारसंघ येतात. येथील पक्षीय बलाबल पाहिले तर दोन्ही कॉँग्रेसचे २३ सदस्य, शिवसेना-भाजपचे १४, तर उर्वरित स्थानिक आघाड्या व अपक्ष आहेत. तसे येथे दोन्ही कॉँग्रेसची ताकद अधिक आहे, पण अंतर्गत राजकारणामुळे आमदार सतेज पाटील यांना मानणाऱ्या ६ सदस्यांची भूमिका आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात राहील. दुसºया बाजूला भाजपच्या ६ सदस्यांपैकी बहुतांशी महाडिक यांनाच मदत करतील, असे चित्र आहे. त्याचबरोबर ताराराणी आघाडीचे बळ महाडिक यांना मिळणार आहे. तरीही ४१ पैकी २० सदस्य हे प्रा. मंडलिक यांना मदत करण्याची शक्यता आहे. दोन्हीकडून जिल्हा परिषदेची यंत्रणा सक्रिय झाली, तर येथे काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.
हातकणंगले मतदारसंघात पन्हाळा व शाहूवाडीतील प्रत्येकी ४, हातकणंगलेतील ११, तर शिरोळमधील ७ सदस्यांचा समावेश होतो. येथील बलाबल पाहिले तर शिवसेना-भाजपची संख्या लक्षणीय आहे. माजी मंत्री विनय कोरे हे युतीसोबत राहिले तर धैर्यशील माने यांच्या बाजूने १८, तर राजू शेट्टी यांच्या प्रचारात ८ सदस्य सक्रिय होतील.
कागदावर बलाबल दिसत असले तरी स्थानिक राजकारणावर बºयाच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. कबनूरच्या विजया पाटील वगळता हातकणंगले, शिरोळचे भाजपचे सदस्य हे पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस, राष्टÑवादीचे कार्यकर्ते होते. विधानसभा तोंडावर असल्याने शिवसेना-भाजपचे आमदार व सदस्य किती ताकदीने राबणार यावरच येथे तुल्यबळ लढत अवलंबून आहे.
अशी मिळणार सदस्यांची ताकद
तालुका धनंजय संजय
महाडिक मंडलिक
करवीर ५ ६
पन्हाळा ० २
गगनबावडा ० २
राधानगरी ४ १
भुदरगड २ २
कागल ३ २
चंदगड ३ १
गडहिंग्लज ३ २
आजरा १ २
एकूण २१ २०

Web Title: Zip Both of the members have the same 'strength'; 21 Mahadikas and 20 members in the circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.