फुलेवाडी परिसरात जहाल विषारी इंडियन कोब्रा -नैसर्गिक अधिवासात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 07:31 PM2019-04-17T19:31:28+5:302019-04-17T19:41:33+5:30
फुलेवाडी परिसरातील इंगवले कॉलनी येथील पलाश पाटील यांच्या घरी बुधवारी दुपारी सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी इंडियन कोब्रा या सहा फुटी जहाल विषारी सापास पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
कोल्हापूर : फुलेवाडी परिसरातील इंगवले कॉलनी येथील पलाश पाटील यांच्या घरी बुधवारी दुपारी सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी इंडियन कोब्रा या सहा फुटी जहाल विषारी सापास पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
इंगवले यांच्या घरी बुधवारी दुपारी कंपौंडलगत सहा फुटी धामण आल्याचा फोन इंगवले यांनी फोनवरून सर्पमित्र नामजोशी यांना सांगितले. त्या ठिकाणी तात्काळ दाखल होत पाहणी केली असता तो अति जहाल विषारी इंडियन कोब्रा निघाला. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर नामजोशी यांनी त्या सापास ताब्यात घेतले. विशेष म्हणजे धामण बिनविषारी असल्याने त्यांनी काचेची बरणीही आणली नव्हती. पण सुरक्षितरित्या त्या सापास ताब्यात घेतले. हा साप बिनविषारी नसून तो अत्यंत जहाल विषारी असल्याचे नामजोशी यांनी इंगवले कुटूंबियांना सांगितले. प्रथम त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात इंगवले व नामजोशी यांनी सोडले.