जि.प. सदस्यांना सहलीला पाठवण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:48+5:302021-07-02T04:16:48+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुक जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद आणि काँग्रेसकडे उपाध्यक्षपद असा बदल ...

Z.P. Preparing to send members on a trip | जि.प. सदस्यांना सहलीला पाठवण्याची तयारी

जि.प. सदस्यांना सहलीला पाठवण्याची तयारी

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुक जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद आणि काँग्रेसकडे उपाध्यक्षपद असा बदल झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. सध्या भाजपकडून हालचाली नसल्या तरी ऐनवेळी दोन्ही पदासाठी उमेदवार दिल्यास अडचण होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांना अधिवेशन झाल्यानंतर सहलीला पाठवण्यात येणार आहे. त्याची तयारी आतापासून केली जात आहे.

जि.प. पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात येणार असल्याने विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींनी राजीनामा दिला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड १२ जुलैला आणि सभापती निवड १३ जुलैला होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने युवराज पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी अजून एकमत झालेले नाही. पण अपक्ष म्हणून शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि काँग्रेससोबत असलेल्या रसिका पाटील यांनाही उपाध्यक्षपद मिळू शकते. उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर सभापतींची नावे अंतिम करण्यात येणार आहे. पण सभापतीपदासाठीही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांना पाच महिनेच काम करण्यासाठी मिळणार आहे. इतक्या कमी कालावधीसाठी सदस्यांची जोडणी कोण करणार, असाही एक प्रवाह भाजपमधील सदस्यांमध्ये आहे. पण इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सतर्क झाले आहेत. यामुळेच ५ आणि ६ जून रोजी अधिवेशन झाल्यानंतर आघाडीच्या सदस्यांना सहलीला पाठवण्यात येणार आहे.

चौकट

सभापतीपदासाठी प्रभळ दावेदार असे : बांधकाम सभापती - वंदना जाधव (कसबा वाळवे, राधानगरी), समाजकल्याण - कोमल मिसाळ (वडगणे, करवीर), महिला, बालकल्याण - शिवानी भोसले (चिखली, कागल), शिक्षण - कलाप्पा भोगण

Web Title: Z.P. Preparing to send members on a trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.