१ कोटी ९१ लाख ग्राहकांनी ऑनलाईन भरले ३० कोटींचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:32+5:302021-09-04T04:24:32+5:30
ऑनलाईन सुविधेमुळे ग्राहकांची उत्तम सोय होत आहे. ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एसएमएस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी सुरु आहे. ग्रामीण ...
ऑनलाईन सुविधेमुळे ग्राहकांची उत्तम सोय होत आहे. ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एसएमएस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी सुरु आहे. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फे आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एसएमएस सेवा सुरु करण्यात आलेली आहे. लातूर मंडलातून ऑगस्ट महिन्यात ८८ हजार २४२ ग्राहकांनी १४ कोटी ६८ लाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ४७ हजार ४३० ग्राहकांनी ६ कोटी ३५ लाख, तर बीड जिल्ह्यातून ५५ हजार ३६४ ग्राहकांनी ९ कोटी ३ लाख रुपयांचा ऑनलाईन वीज बिल भरणा केला. संगणकावर किंवा महावितरण मोबाईल ॲप व महापावर पे, प्रीपेड वॉलेटच्या मदतीने वीज बिल भरण्याची पध्दत आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या संकेत स्थळावर जावून ऑनलाईनवीज बिल भरता येते. शिवाय, महावितरणने वीज बिलांची उपलब्धता आणि वीज बिल भरण्यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. मोबाईल ॲप किंवा महावितरणच्या संकेत स्थळावर ग्राहकांना चालू किंवा थकबाकीची देयकेही पाहण्याची सोय आहे. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकींगव्दारे बिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन वीज बिल भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकांना मिळते. ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
वेळेसाेबत पैशांची होते बचत...
ऑनलाईन वीजबिलाचा भरणा केल्याने पैशांची बचत होत आहे. अनेक जण निर्धारित वेळेत बिल भरत नाही त्यामुळे दंड आकारला जातो. मात्र, अनेक ग्राहक मर्यादीत तारखेलाच ऑनलाईन बिलाचा भरणा करीत आहेत. महावितरणच्या ऑनलाईन उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.