लातूरच्या पाण्याचे ९ कोटींचे बिल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:44 AM2019-09-05T05:44:17+5:302019-09-05T05:44:27+5:30
२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती.
लातूर : लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट असताना रेल्वेने पुन्हा २८ आॅगस्टला २०१६ मध्ये केलेल्या पाणीपुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल धाडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे यासाठी पाठपुरावा करीत आहे. दरम्यान, हे बिल राज्य सरकारने भरावे अथवा माफ करण्यात यावे, यासाठी महानगरपालिका पुन्हा पत्रव्यवहार करणार आहे.
२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला
होता. यासाठी ९ एप्रिल ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत रेल्वेच्या १११ फेऱ्या झाल्या होत्या. त्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल भरावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी संबंधित पत्रावर कारवाई करावी म्हणून हे पत्र महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.