मांजरा-तेरणा संगम परिसरातील १० गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:06+5:302021-09-26T04:22:06+5:30
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व कर्नाटक सीमा परिसरात सतत पाऊस होत आहे. मांजरा नदीला पूर आल्याने आणि तेरणा नदीवरील ...
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व कर्नाटक सीमा परिसरात सतत पाऊस होत आहे. मांजरा नदीला पूर आल्याने आणि तेरणा नदीवरील बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने दोन्ही नद्यांच्या संगम परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, औराद शहाजानी, तगरखेडा, हालसी, वांजरखेडा, काेंगळी, जामखंडी यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमा भागातील शेकडो एकर जमिनीवर पाणी पसरले आहे. त्यामुळे या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
दोन्ही नद्यांच्या संगमाजवळ ४ ते ५ किमी बॅक वॉटर आल्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जाेडणारा औराद- तुगाव, औराद - वांजरखेडा, औराद- तगरखेडा मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, तुगाव, वांजरखेडा, काेंगळी, श्रीमाळी, आळवाई, गुंजरगा या गावांचा संपर्क तुटला. तसेच वलांडी, उदगीर जाणारे अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत.
सोबत फोटो...
२५ एलएचपी औराद शहाजानी : मांजरा आणि तेरणा नद्यांच्या संगमानजीक औराद शहाजानी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बॅक वॉटरमध्ये शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.