बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:45+5:302020-12-23T04:16:45+5:30
दापक्याळ येथील पीडित महिलेच्या पतीचा मित्र मोहन बाबूराव कासले हा नेहमीच पीडितेकडे वाईट नजरेने बघायचा. याबाबत पीडितेने तिच्या पतीस ...
दापक्याळ येथील पीडित महिलेच्या पतीचा मित्र मोहन बाबूराव कासले हा नेहमीच पीडितेकडे वाईट नजरेने बघायचा. याबाबत पीडितेने तिच्या पतीस ही बाब सांगितली. परंतु, तिच्या पतीने तो माझा मित्र आहे असे समजून दुर्लक्ष केले. दरम्यान, ४ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री ९.३० वाजता शेतात पाणी देण्यासाठी पीडितेचा पती तसेच त्याचा मित्र मोहन कासले गेले. त्या दोघांच्या जेवणाचा डबा घेऊन पत्नीही शेतात पोहोचली होती. लाईट गेल्याने पीडितेचा पती मोटार चालू करण्यासाठी गेला असता, आरोपीने पाठीमागून येऊन झोंबाझोंबी केली आणि अत्याचार केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यानंतर पीडितेचा पती धावत आला असता आरोपी पळून गेला. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात कलम ३७६, ३२३ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला. तपासाअंती दोषारोपपत्र दाखल झाले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पीडिता, पीडितेचा पती यांची साक्ष व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी यांनी आरोपी मोहन बाबूराव कासले यास १० वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपयांचा दंड, ६ महिने सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असल्याचे सहाय्यक सरकारी वकील व्ही.व्ही. देशपांडे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास पोउनि शैलेश बंकवाड यांनी केला. तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड.व्ही.व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. वैशाली वीरकर यांनी साह्य केले. महिला पोलीस नाईक सुमन हाळे यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.