गांजाची वाहतूक करणाऱ्या तीन आराेपींना दहा वर्षांचा कारावास

By राजकुमार जोंधळे | Published: November 28, 2022 06:28 PM2022-11-28T18:28:46+5:302022-11-28T18:29:06+5:30

उदगीर न्यायालयाचा निकाल : तीन आरोपींना प्रत्येकी एक लाखाचा दंड

10 years imprisonment for three arrested for transporting ganja | गांजाची वाहतूक करणाऱ्या तीन आराेपींना दहा वर्षांचा कारावास

गांजाची वाहतूक करणाऱ्या तीन आराेपींना दहा वर्षांचा कारावास

Next

लातूर : गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघा आराेपींना दहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक लाखाचा दंड अशी शिक्षा उदगीर येथील अतिरिक्त व विशेष सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये २०२० मध्ये गांजाची चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतूक करताना तिघा आरोपींना १७६ किलो गांजा आणि जीप अशा मुद्देमालासह पाेलिसांच्या पथकाने सापळा लावून पकडले. याबाबत वाढवणा पाेलिस ठाण्यात कर्नाटकातील राहुल नीलकंठ पवार, शिरीष रघुनाथ जाधव आणि सोमनाथ शिवाजी जाधव (सर्व रा. माळेगाव तांडा, ता. औराद बऱ्हाळी, जि. बिदर) यांच्या विराेधात गुरनं. १४८/२०२० कलम २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढवणा पोलिस ठाण्यात तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी या गुन्ह्याचा प्राथमिक पंचनामा, तपास केला. पोलिस निरीक्षक सोंडारे यांनी पुढील तपास करून गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध परिस्थितीजन्य आणि भौतिक पुरावे गोळा करून दोषारोपपत्र उदगीर येथील न्यायालयात दाखल केले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तपास अधिकारी, समन्स आणि वॉरंट बजावणारे पोलिस अंमलदार यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. गुन्ह्यातील इतर साक्षीदार, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोषारोपपत्रासोबत दाखल केलेल्या परिस्थितीजन्य आणि भौतिक पुराव्यावरून उदगीर येथील न्यायालयाने गुन्ह्यातील आरोपींना दहा वर्षे कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ही कामगिरी देवणी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक साेंडारे, वाढवणा ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहायक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण, सहायक सरकारी अभियोक्ता सय्यद, अंमलदार साळुंखे, माळवदे, नितीन बेंबडे, सूर्यकर, अक्केमोड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Web Title: 10 years imprisonment for three arrested for transporting ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.