लातूर शहरात कोनोराचे १०६ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:13+5:302021-01-13T04:49:13+5:30
मनपाहद्दीत आतापर्यंत ९ हजार ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील ८ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ...
मनपाहद्दीत आतापर्यंत ९ हजार ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील ८ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५० वर्षांच्या पुढील १७२ जण आहेत. एकूण मयत रुग्णांपैकी ५८ स्त्री आणि १५१ पुरुष आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयात १०६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.३० टक्के आहे. तर जिल्ह्याचे मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के एवढे आहे. मनपा हद्दीतील मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यापेक्षा कमी आहे. ही बाब दिलासादायक असून, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दररोज ५५० च्या पुढे चाचण्या केल्या जात आहेत. रुग्णसंख्या घटली असली तरी अद्याप धोका टळला नसून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.