१३०० चाचण्यांत आढळले ३५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:54 AM2021-02-20T04:54:59+5:302021-02-20T04:54:59+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ६३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५७५ निगेटिव्ह तर १४ ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ६३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५७५ निगेटिव्ह तर १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ६७५ जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ६५४ निगेटिव्ह तर २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचणी असे दोन्ही मिळून ३५ नव्या बाधितांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ३३२ रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी २०५ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८३ टक्क्यांवर असून मृत्यूदर २.८ टक्क्यांवर आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ७०० दिवसांवर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
२३ जणांची कोरोनावर मात
गुरुवारी २३ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह बारा नंबर पाटी येथील २, खासगी रुग्णालय २ तर होमआयसोलेशनमधील १५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी १३०९ जणांची तपासणी करण्यात आली होती.