अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या दिग्दर्शक बंधूंना १४ दिवसांची कोठडी

By admin | Published: January 7, 2017 06:52 PM2017-01-07T18:52:24+5:302017-01-07T18:52:24+5:30

चित्रपटात अभिनेत्री करण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या दिग्दर्शक बंधूंना १४ दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली.

14-day stolen cartoon hero for kidnapping of minor girls | अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या दिग्दर्शक बंधूंना १४ दिवसांची कोठडी

अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या दिग्दर्शक बंधूंना १४ दिवसांची कोठडी

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ -  चित्रपटात अभिनेत्री करण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाºया विजय खडके (२३), राहूल खडके (२१, रा़ मोहगाव तळणी ता़ रेणापूर)  या दिग्दर्शक बंधूंना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़.
रेणापूर तालुक्यातील मोहगाव तळणी येथील हे खडके बंधू गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत होते़. त्यासाठी गेल्या आॅगस्ट पासून लातुरातील रेणुका नगर परिसरात त्यांनी भाड्याने घरही घेतले होते. गेल्या तीन-चार महिन्यात त्यांनी घरमालकाशी जवळीकता साधली़. या घरमालकाला एक १६ वर्षाची मुलगी असून, ती हुशार आहे. तिला संगीताची आवड आहे. आम्ही कॉलेज लाईफ हा चित्रपट काढत आहोत तिला आमच्या चित्रपटासाठी आमच्यासोबत पाठवा़ आम्ही तिला अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देऊ, असे म्हणून तिच्या पित्याला विश्वासात घेऊन १ जानेवारी रोजी दोघा दिग्दर्शक बंधूंनी शेजारच्या मुलीला पाठवून घर मालकाच्या मुलीला बाहेर बोलवून पळवून नेले. घरच्यांनी शोध घेतला मात्र ती सापडली नाही़. त्यानंतर घर मालकाने थेट दिग्दर्शक बंधूंशी संपर्क साधला़ या दोघा बंधूंनी चक्क उडवाउडवीची उत्तरे दिली़. यातून मुलीच्या आईचा संशय बळावल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला़ विजय खडके व राहूल खडके या दोघालाही मोहगाव तळणी येथून दोन मुलीसह पोलिसांनी अटक केली़ त्यांना एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़

Web Title: 14-day stolen cartoon hero for kidnapping of minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.