‘नीट’साठी ५० हजार अडव्हाॅन्स देणारे चाैदा जण!
By राजकुमार जोंधळे | Published: June 26, 2024 12:02 AM2024-06-26T00:02:05+5:302024-06-26T00:02:48+5:30
नीट : दुसऱ्या आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
राजकुमार जाेंधळे, लातूर : नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत १४ जणांनी आराेपींना ५० हजार रुपये अडव्हाॅन्स दिले असून, त्याची यादीच पाेलिसांच्या हाती लागली आहे. त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता असून, १४ पैकी ६ जणांना लातूर पाेलिसांनी चाैकशीसाठी मंगळवारी पाचारण केले हाेते.
काेठडीत असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधवकडे १४ जणांनी प्रवेशपत्रे आणि राेख रक्कम दिल्याचा जबाब त्यातील काही जणांनी पाेलिस चाैकशीत नाेंदविला. दरम्यान, काेठडीत असलेला आराेपी संजय जाधव याची पाेलिस कसून चाैकशी करत आहेत. अडव्हाॅन्स म्हणून प्रत्येकी ५० हजार घेतले हाेते. मात्र, काम न झाल्याने त्यांना राेखीने पैसे परत दिले, अशी कबुली जाधवने दिली आहे. तर काहींचे पैसे देणे बाकी असल्याचेही त्याने पाेलिसांना सांगितले.
आराेपी म्हणाला भाचाचे सहा लाख...
संजय जाधव पाेलिस चाैकशी म्हणाला माझ्या खात्यावर असलेले सहा लाख भाचाचे आहेत. त्याच्या भावाच्या कामासाठी ही रक्कम माझ्याकडे आल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच अडव्हाॅन्स घेतलेले ५० हजार राेखीने परत केले असून काही जणांचे देणे असल्याचे ताे तपास अधिकाऱ्यासमाेर सांगत आहे.
दुसऱ्या आराेपीला २ जुलैपर्यंत काेठडी...
आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आधीपासूनच पाेलिस काेठडीत असून, दुसरा आराेपी शिक्षक संजय जाधव यास अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. सध्या दाेघे पाेलिस काेठडीत असून, इरण्णा काेनगलवार व गंगाधर याचा शाेध सुरु आहे. तसेच पठाण व जाधव यास सहाय्य करणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी उचलले आहे. त्यांचीही चाैकशी सुरु आहे.