लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

By हणमंत गायकवाड | Published: June 16, 2023 04:25 PM2023-06-16T16:25:00+5:302023-06-16T16:25:12+5:30

नव्याने दाखल १५ चारचाकी वाहनांमुळे तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे.

15 new four wheelers included in Latur Police Force; Handed over by Deputy Chief Minister Devendra Fadnavis | लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

googlenewsNext

लातूर : जिल्हा पोलीस दलाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.

लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली १५ चारचाकी वाहनांमुळे ''डायल ११२'' अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

Web Title: 15 new four wheelers included in Latur Police Force; Handed over by Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.