लातूर जिल्ह्यात रोहयोतून ४३० गावांतील १५ हजार मजूरांच्या हाताला काम !

By संदीप शिंदे | Published: March 11, 2023 07:04 PM2023-03-11T19:04:58+5:302023-03-11T19:05:12+5:30

जिल्ह्यातील ३५६ गावांना कामांची प्रतीक्षा

15,000 laborers from 430 villages from Rohyo in Latur district! | लातूर जिल्ह्यात रोहयोतून ४३० गावांतील १५ हजार मजूरांच्या हाताला काम !

लातूर जिल्ह्यात रोहयोतून ४३० गावांतील १५ हजार मजूरांच्या हाताला काम !

googlenewsNext

लातूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ७८६ ग्रामपंचायती असून, यातील ४३० गावांमध्ये १ हजार ९३२ कामे सुरु असून, या कामांवर १५ हजार २९३ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर जिल्ह्यातील ३५६ ग्रामपंचायतींना रोहयोच्या कामांची प्रतीक्षा लागली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी शासनाच्या वतीने ॲपवर ऑनलाईन हजेरीची पद्धत राबविली जात आहे. यामध्ये सकाळ आणि सांयकाळच्या सत्रात मजूरांच्या प्रत्यक्ष कामाच्या स्थळावर जावून हजेरी घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात ४३० गावांमध्ये १ हजार ९३२ कामे सुरु आहेत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर १४०१ कामे सुरु असून, ११ हजार ६१४ मजूर कार्यरत आहेत. तसेच कृषि विभागाच्या २३३ कामांवर ९१९, वन विभाग ९० कामांवर १ हजार ६६ मजूर, रेशीम विभागाच्या ८८ कामांवर ३३१, सामाजिक वनीकरण ९५ कामांवर ६५८ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ कामांवर ७९५ मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ५४ टक्के ग्रामपंचायतीमध्ये कामे सूरु असली तरी उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक कामे सुरु...
जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक १ हजार ४०१ कामे सुरु आहेत. यामध्ये ११ हजार ६१४ मजूर कार्यरत आहेत. तसेच अहमदपूर तालुक्यात २१५ कामांवर १३०७, औसा २४३ कामांवर २५५०, चाकूर ८२ कामांवर ६३१, देवणी ७६ कामे ११३६, जळकोट ८३ कामे ४९३, लातूर १२२ कामे ६४४, निलंगा ८४ कामे ७१०, रेणापूर १५१ कामे १६३९, शिरुर अनंतपाळ ३८ कामे २४९ तर उदगीर तालुक्यात ३०७ कामांवर २२३५ मजूर कार्यरत आहेत.

ऑनलाईन हजेरीमुळे कामांत पारदर्शकता...
रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर मजूरांची सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात ऑनलाईन हजेरी घेण्यात येत आहे. याबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेण्यात आलेला आहे. रोहयोच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, हा त्यामागचा उद्देश असून, रोजगार सेवकांकडून कामे सुरु असलेल्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष सकाळी आणि सायंकाळी हजेरी घेतली जात आहे. दरम्यान, सध्या मजूर मित्र संकल्पनाही राबविली जात असल्याचे रोहयो विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अशी आहे आकडेवारी...
तालुका सुरु कामे कार्यरत मजूर
अहमदपूर ३२२ १९८१
औसा ३५५ ३१४०
चाकूर १०२ ८००
देवणी १०० १६२३
जळकोट १०८ ६४८
लातूर २२३ १३०१
निलंगा १२४ ९४४
रेणापूर २०५ १८४९
शिरुर अनं. ५५ ३५२
उदगीर ३३८ २६५५
एकूण १९३२ १५२९३

Web Title: 15,000 laborers from 430 villages from Rohyo in Latur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर