लातुरात १६ जणांची कोरोनावर मात; तीन नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:13 PM2020-06-24T21:13:34+5:302020-06-24T21:14:00+5:30
सद्यस्थितीत आता जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ६२ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
लातूर : जिल्ह्यात बुधवारी एकूण १६ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. दरम्यान, नवीन तीन रुग्णांची भर पडली असून, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख २४९ वर पोहोचला आहे.
बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये एक जण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील डॉक्टर असून, त्यांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. तर अन्य दोघांचा संपर्क तपासला जात आहे. दरम्यान, बुधवारी ६९ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी झाली. त्यापैकी ५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तीन पॉझिटिव्ह आले आहेत. तर सात जणांचे अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. सुटी मिळालेल्या रुग्णामध्ये लातूरचे ५, उदगीरचे ८ आणि औसा तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. सद्यस्थितीत आता जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ६२ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.