१७०० चाचण्यांमध्ये ५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:18+5:302021-01-13T04:48:18+5:30
रविवारी ४५ जणांची कोरोनावर मात... प्रकृती ठणठणीत झाल्याने रविवारी ४५ जणांना सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय ...
रविवारी ४५ जणांची कोरोनावर मात...
प्रकृती ठणठणीत झाल्याने रविवारी ४५ जणांना सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १०, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ५, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील २, समाजकल्याण होस्टेल कव्हा रोड येथील ६ आणि होम आयसोलेशनमधील १४, अशा एकूण ४५ जणांचा समावेश आहे.
पॉझिटिव्हीटी रेट ११.७ टक्के...
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सध्या ११.७ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये २३.५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता. आता त्यात कमालीची घट झाली असून, कोरोना आरोग्य विभागाच्या नियंत्रणात आहे. एप्रिल २०२० मध्ये ४.८ टक्के, मे २०२० मध्ये ८.९ टक्के, जूनमध्ये ९.२ टक्के, जुलैमध्ये १५.१, ऑगस्टमध्ये १५.९, सप्टेंबरमध्ये २३.५, ऑक्टोबरमध्ये १६.३, नोव्हेंबरमध्ये ६.४, तर डिसेंंबरमध्ये १२.८ टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता. नव्या वर्षात २०२१ मध्ये पॉझिटिव्हीटी रेट सरासरी १० टक्क्यांच्या खाली असून, १ लाख ६९ हजार २६९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३ हजार ३०७ बाधित आढळले असून, याचा पॉझिटिव्ही रेट ११.७ टक्के आहे.