लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड
By संदीप शिंदे | Published: September 3, 2022 04:43 PM2022-09-03T16:43:54+5:302022-09-03T16:44:23+5:30
जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पेनेतून प्रथमच मुलाखती
लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने १९ आदर्श शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक मधील आरती कांबळे लातूर, नयूम सय्यद औसा, विठ्ठल चांभारगे निलंगा, संतोष सुतार शिरुर अनंतपाळ, जनार्दन जाधव उदगीर, सूर्यकांत बोईनवाड अहमदपुर, धोंडीबा पवार जळकोट, दत्तात्रय इगे रेणापूर, चाकूर तालुक्यातील देविदास माने यांची तर माध्यमिक मधून सुरेंद्र चौहान देवणी, नागनाथ कदम अहमदपूर, वर्षाराणी शेरे निलंगा, आरती मलशेटवार उदगीर, माधव वाघमारे जळकोट, नितीन माशाळकर चाकूर, गोकुळ देवर्षे रेणापूर, माधुरी भुरे औसा तर दिव्यांग शिक्षकांमधून निलंगा तालुक्यातील शिवाजी जाधव यांची निवड झाली.
पुरस्कारासाठी यंदा प्रथमच मुलाखती...
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या संकल्पनेतून शिक्षक पुरस्कारासाठी यंदा प्रथमच मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पुरस्काराचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. शुक्रवारी या प्रस्तावांना मंजूर मिळाली असल्याचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.
डॉ. जनार्दन वाघमारे यांना पुरस्कार...
जिल्हा परिषदेच्या वतीने २०२१-२२ या वर्षाचा डॉ. देवींसिंह चौहान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर करण्यात आला आहे.