देवणीतील कोविड सेंटरमध्ये आणखीन ऑक्सिजनयुक्त २० खाटा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:09+5:302021-05-17T04:18:09+5:30
देवणीतील कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तहसील कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा ...
देवणीतील कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तहसील कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप गुरमे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नीळकंठ सगर, डॉ.हरिदास, डॉ.कालिदास बिरादार, डॉ.अंथनी, डॉ.बुद्धरे, डॉ.गिरी यांच्यासह जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, प्रशांत पाटील, पृथ्वीराज शिवशिवे, सभापती सविता पाटील, उपसभापती शंकरराव पाटील, बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, चेअरमन दगडु सोळुंके, भगवानराव पाटील तळेगावकर, हावगीराव पाटील, काशिनाथ गरिबे, मनोहर पाटणे, तुकाराम पाटील, रामलिंग शेरे, प्रशांत पाटील, अटल धनुरे, संतोष पाटील, सुशांत पाटील, ओम धनुरे, मयूर पटणे आदींची उपस्थिती होती.
आराेग्य साहित्याचे लोकार्पण...
अक्का फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या आरोग्य साहित्याचे माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी लोकार्पण केले. कोविड केअर सेंटरला सेंट्रल ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाइपलाइन देण्यात येईल, तसेच लवकरच आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी कोविड चाचणी करुन घ्यावी, तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.