संजय गांधी निराधार समितीचे २०४ अर्ज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:38+5:302021-07-17T04:16:38+5:30
बैठकीस सदस्य सचिव तथा तहसीलदार सुरेश घोळवे, शासकीय सदस्य गटविकास अधिकारी अच्युत पाटील, नायब तहसीलदार सविता माडजे, सदस्य औदुंबर ...
बैठकीस सदस्य सचिव तथा तहसीलदार सुरेश घोळवे, शासकीय सदस्य गटविकास अधिकारी अच्युत पाटील, नायब तहसीलदार सविता माडजे, सदस्य औदुंबर पांचाळ, बालाजी बिरादार, कृष्णा पाटील बोरोळे, यशवंत सोनकांबळे, महेराज शेख यांची उपस्थिती होती. बैठकीची पूर्वतयारी, नियोजन व ऑनलाइन बैठक व्यवस्था ऊर्मिला तिडके, शिवराज चिद्रे, प्रदीप कांबळे, व्यंकटेश विजापुरे यांनी केली.
या बैठकीत सामाजिक अर्थसाहाय्य योजनेचे एकूण २०७, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे ११७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना २८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना १, संजय गांधी निराधार योजना ५८ असे एकूण २०४ अर्ज मंजूर करण्यात आले. त्रुटी असलेल्या तीन अर्जांची फेरचौकशी करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. यावेळी कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसास व आर्थिक दृष्टिकोनातून सामाजिक अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या ९ अर्जांना मंजुरी देण्यात आली.