२२ हजार वाहन चालकांकडून २१ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:26+5:302021-09-26T04:22:26+5:30
याबाबत जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील वाहनधारकांवर आकारण्यात आलेला मागील ई-चालान अनपेड चालानच्या दंडाचा भरणा ...
याबाबत जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील वाहनधारकांवर आकारण्यात आलेला मागील ई-चालान अनपेड चालानच्या दंडाचा भरणा करून घेण्याबाबत संबंधित वाहनधारकांच्या माेबाइलवर एसएमएसद्वारे न्यायालयाने नाेटीस बजावली हाेती. या नाेटीसमार्फत २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत लातूर जिल्ह्यातील सर्व पाेलीस ठाणे, लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि पाेलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पाेलीस अंमलदारांनी विशेष माेहीम हाेती घेतली हाेती. दरम्यान, लातूर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या लाेकअदालतमध्ये जिल्ह्यातील २२ हजार १७२ वाहनधारकांकडून २१ लाख १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ऑनलाइन भरता येणार दंड...
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम आता ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी ज्या वाहनांवर ई-चालान अनपेड दंड आलेल्या एमएमएसच्या माध्यमातून जी लिंक प्राप्त झाली आहे. त्या लिंकवरही चालानचा दंड भरून घ्यावा, (mahatrafficechallan.gov.in) असे आवाहन करण्यात आले आहे. अथवा वाहनधारकांनी आपल्या जवळील पाेलीस ठाणे किंवा लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातही दंडाची रक्कम भरून घ्यावी, असे आवाहन
जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.