२२ जणांची काेराेनावर मात; तरी रुग्णालयात दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:08+5:302021-07-22T04:14:08+5:30

काेराेनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पाेस्ट काेविड ओपीडी सुुरू आहे. दरराेज या ओपीडीतून आठ ते दहा रुग्ण उपचारासाठी येतात. ओपीडी सुरू ...

22 defeated Kareena; Although hospitalized! | २२ जणांची काेराेनावर मात; तरी रुग्णालयात दाखल !

२२ जणांची काेराेनावर मात; तरी रुग्णालयात दाखल !

Next

काेराेनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पाेस्ट काेविड ओपीडी सुुरू आहे. दरराेज या ओपीडीतून आठ ते दहा रुग्ण उपचारासाठी येतात. ओपीडी सुरू झाल्यापासून ५०० ते ६०० जणांनी उपचार घेतले आहेत. दम लागणे, छाती जड पडणे, ताप आणि खाेकला येणे अशी लक्षणे असलेले रुग्ण पाेस्ट काेविड ओपीडीत दरराेज येत आहेत. यातील काही रुग्णांना जास्तीचा त्रास असल्यामुळे भरती करून घ्यावे लागले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत रुग्णालयात २२ रुग्ण आहेत. यातील ९ रुग्ण आयसीयूमध्ये असून, ५ रुग्ण जनरल वाॅर्डमध्ये तर ७ रुग्ण कान, नाक, घसा विभागात उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण म्युकरमायकाेसिसचा आहे.

पाेस्ट काेविडचा ज्येष्ठांना सर्वाधिक धाेका...

पाेस्ट काेविड रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक आहेत. दम लागणे, जेवण न जाणे, सर्दी, ताप येणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. हे सर्व पाेस्ट काेविड रुग्ण आहेत.

काेराेनातून बरा, पण श्वसनाचा त्रास...

काेराेनातून बरे झाल्यानंतर श्वसनाचा त्रास असल्याच्या तक्रारी रुग्ण करीत आहेत. त्याचबराेबरच दम लागत असल्याच्याही तक्रारी रुग्ण करीत आहेत.

जेवण न जाणे, छाती जड पडणे, खाेकला आणि सर्दी हाेण्याचाही त्रास पाेस्ट काेविड रुग्णांमध्ये आहे.

६० वर्षांपुढील वयाचे रुग्ण पाेस्ट काेविडमध्ये सर्वाधिक आहेत. शिवाय, बीपी, शुगरच्या रुग्णांचाही यात समावेश आहे.

बरे झाल्यानंतर ही घ्या काळजी...

काेराेनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णांनी काही दिवस आराम करणे गरजेचे आहे. वेळेवर आहार घेणे, भरपूर झाेप घेणे. शिवाय, नियमित हलका व्यायाम करणे गरजेचे आहे.

रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर किमान १५ दिवसानंतर प्रकृतीबाबत डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यासाठी पाेस्ट काेविड ओपीडी आहे.

श्वसनाचा त्रास, दम लागणे, छाती जड पडत असल्यास डाॅक्टरांना दाखवून तपासणी करावी व नियमित औषधाेपचार घ्यावेत.

काेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाेस्ट काेविडचे एकूण २२ रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर याेग्य ते उपचार सुरू आहेत. शिवाय, काेराेनामुक्त रुग्णांसाठी काही त्रास असेल तर पाेस्ट काेविड ओपीडी सुरू आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. काेविडमधून बरे झाल्यानंतर त्रास हाेत असेल तर या ओपीडीत दाखविता येइल.

- डाॅ. संताेषकुमार डाेपे, वैद्यकीय अधीक्षक, लातूर

Web Title: 22 defeated Kareena; Although hospitalized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.