लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:49+5:302021-09-03T04:20:49+5:30
मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. या ...
मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आणि पाणलोट क्षेत्रखालील जमिनीला पाणी मिळण्यासाठी प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. 3३०मीटर आहे. तर धरणाची एकूण पातळी ६४२.३७ मीटर आहे. निर्धारित पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ९५.७४०दलघमी आहे. तर धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी २७.४७ टक्के आहे.
लातूर शहरासाठी उचलले जाते 40 एमएलडी पाणी...
लातूर शहराला पंचेचाळीस ते पन्नास एम एल डी पाणी लागते. त्यानुसार दररोज एवढ्या पाण्याची उचल मांजरा प्रकल्पातून केली जाते. सरासरी ४५ एम एल डी पाणी उचलून शहराला आठ दिवसाला पुरवठा केला जातो. किमान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाई नंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट अखेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे लातूरकरांची डोळे लागले आहेत.
प्रकल्प क्षेत्र परिसरात ३९० मिमी पाऊस....
प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ३९० मिमी पाऊस झाला आहे. धरणात नव्याने २४.०२३ झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे.जेणेकरून धरणातील पाण्याची पातळी वाढेल. क्षेत्रात गुरुवारी २.२०४ दलघमी नवीन पाणी आले आहे.