२५ अर्ज विकले पण एकही अर्ज दाखल नाही
By Admin | Published: March 27, 2016 12:14 AM2016-03-27T00:14:19+5:302016-03-27T00:14:19+5:30
लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़
लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़ नसल्याने महापालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीत फारसा उत्साह नाही़ इच्छुकांनी अर्ज विकत घेतले पण अद्याप एकही अर्ज निवडणूक विभागाकडे आला नाही़ कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दुष्काळाचा विषय पेरण्यात आला़ त्यातच पुन्हा सत्ताधारी काँग्रेसने माघार घेतल्याने निवडणुकीचा रंग फिकट झाला आहे़
लातूर शहर दुष्काळाच्या दुष्ट चक्रात सापडलेले असताना पाण्याचा विषय गंभीर बनला आहे़ सर्वत्र एकच मागणी ती म्हणजे पाण्याचीच़ कचऱ्याचाही प्रश्न गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे़ रखरखत्या उन्हात घागरभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पोटनिवडणुकीविषयी आस्था उरली नाही़ काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे़ मागील दीड वर्षांपासून त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा होती़ त्यावेळी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्याही अधिक होती़ आता नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे़ त्यामुळे खर्च करायचा कसा ? त्यात पुन्हा दुष्काऴ केलेला खर्चही निघणे शक्य नसल्याने इच्छुकांची संख्या घटली आहे़ काँगे्रसने माघार घेतल्याने पोटनिवडणुकीची रंगत गेली असली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू आहे़ शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी या दोघांनीही पोटनिवडणूक
लढायचीच असा पण केला
आहे़ २९ मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात आणि त्यातून कितीजण माघार घेतात, यावर निवडणुकीच्या रंगाचा ढंग समोर येणार आहे़
राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे म्हणाले, आम्ही निवडणूक लढणार आहोत, दहा इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत़