काेराळवाडी येथील छाप्यात २६०० लीटर रसायन केले जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: November 7, 2022 06:10 AM2022-11-07T06:10:24+5:302022-11-07T06:10:50+5:30
निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र - कनार्टक सीमेवर असलेल्या काेराळवाडी येथील हातभट्टी अड्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी हातभट्टीसह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर :
निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र - कनार्टक सीमेवर असलेल्या काेराळवाडी येथील हातभट्टी अड्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी हातभट्टीसह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत कासार शिरसी पाेलीस ठाण्यात सहा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
पोलिसांनी सांगितले, कोराळवाडी येथे हातभट्टी दारू तयार करून, ती चाेरट्या मार्गाने विक्री केली जात असल्याची मािहती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी कासार शिरसी ठाण्याच्या पोलिसांनी काेराळवाडी येथील हातभट्टी अड्डयावर छापा मारला. यावेळी तब्बल २ हजार ६०० लीटर रसायन, त्यासाठी लागणारे साहित्य, हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कासार शिरसी पाेलीस ठाण्यात साहेबा महादू कानडे, संजय गोविंद पाटील, राम अण्णाराव सबदाडे, नामदेव श्रीमंत सबदाडे, व्यंकट दौलाप्पा रेवणे आणि दत्तू गुंडाप्पा बुकले ( सर्व रा. कोराळवाडी) या सहा जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे,अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, निलंगा येथील उपिवभागीय पाेलीस अधिकारी दिनेश काेल्हे यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक पाेलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, पोलीस उपिनरीक्षक गजानन क्षीरसागर, पोलीस अंमलदार घोरपडे, तपासे, नरवटे, भोंग, सोनटक्के, इंदापुरे यांच्या पथकाने केली आहे.