११ ग्रामपंचायतीच्या २७ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:46+5:302021-01-13T04:48:46+5:30
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २२९ जागांसाठी ५९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४७६ ...
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २२९ जागांसाठी ५९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४७६ उमेदवार रिंगणात होते. त्यातील ११ गावांतील २७ उमेदवार बिनविराेध निघाले आहेत. आता निवडणुकीच्या आखाड्यात ४४९ उमेदवार आहेत. गावागावांत प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे. उमेदवारांचे चिन्ह समजावे म्हणून बॅनर, पाेस्टर झळकू लागले आहेत.
बिनविरोधमध्ये सर्वाधिक महिला...
बिनविरोधची परंपरा असलेल्या धामनगाव, कळमगाव, हालकी, कारेवाडी आदी गावांतही यंदा निवडणूक होत आहे. त्यामुळे उमेदवार आणि स्थानिक पुढा-यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जोगाळा पुरुष- १, महिला- १, येरोळ पुरुष- १, महिला- ३, धामनगाव महिला- ६, कारेवाडी महिला २, बिबराळ महिला- १, हालकी महिला- २, अंकुलगा स. महिला २, शेंद पुरुष- १, कानेगाव महिला १, सांगवी घुग्गी महिला १ हे बिनविरोध आले आहेत.