दीड हजार चाचण्यांत आढळले २८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:58+5:302021-01-10T04:14:58+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी ८४३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७८७ निगेटिव्ह तर ९ ...

28 infected found in one and a half thousand tests | दीड हजार चाचण्यांत आढळले २८ बाधित

दीड हजार चाचण्यांत आढळले २८ बाधित

Next

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी ८४३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७८७ निगेटिव्ह तर ९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. ८५१ जणांची रॅपिड ॲँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ८३२ निगेटिव्ह तर १९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. प्रयोगशाळेतील चाचणी आणि रॅपिड ॲँटिजेन असे दोन्ही मिळून २८ नव्या बाधितांची भर पडली आहे. सध्या २९६ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १७४ होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ६९० दिवसांवर पोहोचला असून, मृत्यूदर २.९ टक्क्यांवर आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९५.८० टक्क्यांवर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी २६ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, उदगीर सामान्य रुग्णालय ३, बारा नंबर पाटी वसतिगृह ३, निवासी शाळा औसा येथील १, समाजकल्याण वसतिगृह येथील ३ तर होम आयसोलेशनमधील ७ जणांचा समावेश आहे.

Web Title: 28 infected found in one and a half thousand tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.