लातूर जिल्ह्यात ३ पॉझिटिव्ह; ६ जणांना रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 08:47 PM2020-06-05T20:47:53+5:302020-06-05T20:48:12+5:30
५४ स्वॅब पैकी ५१ निगेटिव्ह
लातूर : लातूर जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या ५४ पैकी ५१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये लातूर शहरातील भाग्य नगर येथील १ आणि औसा येथील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ६ रुग्णांना सुटी मिळाली असून, आतापर्यंत १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २० व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी १९ निगेटिव्ह असून, १ पॉझिटिव्ह आहे. तर औसा येथून २३ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख १४५ वर पोहोचला आहे. समाधानाची बाब म्हणजे यातील १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ४५ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.