१५ हजार शेतकऱ्यांना ३० कोटींचे अनुदान, ११ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 08:19 PM2019-01-23T20:19:57+5:302019-01-23T20:20:28+5:30

लातूर जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

30 crores grant to 15 thousand farmers, 11 thousand hectare area under irrigation | १५ हजार शेतकऱ्यांना ३० कोटींचे अनुदान, ११ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

१५ हजार शेतकऱ्यांना ३० कोटींचे अनुदान, ११ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

Next

- राजकुमार जोंधळे 
 
लातूर  - जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २० जानेवारी अखेरपर्यंत ६ हजार ४४८ शेतक-यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. 

शेतकºयांना अल्प पाण्यावर अधिक उत्पादन घेता यावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात ठिबक सिंचन योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १५ हजार ३३४ लाभार्थी शेतकºयांना एकूण २८ कोटी ५२ लाख ७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या योजनेमध्ये राज्य शासनाच्या वतीने ८० टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरुपात दिली जाते. उर्वरित २० टक्के रक्कम संबंधित लाभार्थी शेतकºयांना खर्च करावी लागती. दिवसेंदिवस अल्प पावसामुळे  खरीप आणि रबी हंगाम धोक्यात येत आहे. आहे त्या पाण्यावर पीक घेणे कठीण होत आहे. यासाठी अल्प पाण्यावर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतल्यास शेतकºयांना फायदा होतो. राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ठिबक सिंचन योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांतून प्रतिसाद मिळत आहे. 

२०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १५ हजार ३४४ शेतक-यांनी या योजनेसाठी आपले प्रस्ताव दाखल केले होते. या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अनुदानापोटी २८ कोटी ५२ लाख ७ हजारांचे वाटप केले.

ठिबक योजनेला कृषी विभागाकडून प्रोत्साहन
बदलते पर्यावरण आणि हवामानाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे अनिवार्य ठरले आहे. पारंपरिक शेतीला बाजूला सारत नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती अधिक फायदेशीर ठरु शकते. यासाठी ठिबक सिंचन योजनेला प्रोत्साहन दिले जात आहे.

११ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन...
जिल्ह्यातील १५ हजार ३४४ शेतकºयांनी सिंचनाचा प्रयोग सुरू केल्यानंतर ११ हजार ४५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यामध्ये ३ हजार ४५१ क्षेत्र ठिबक तर ११ हजार ८९३ हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली आले आहे.

२०१८-१९ साठी प्रस्ताव
तालुका     लाभार्थी  अर्ज बाद
अहमदपूर    ६१६    ००
औसा    १५९४    १७
चाकूर    ९५२    २९
देवणी    १७५    ००
जळकोट    २८२    ५२
लातूर    ५५३    ०६
निलंगा    ११०९    ४५
रेणापूर    २९४    ०२
शिरूर अनंतपाळ    ४४८    १२
उदगीर    ४२५    ०२
एकूण    ६४४८    १६५
(२० जानेवारीपर्यंतची आकडेवारी)   

Web Title: 30 crores grant to 15 thousand farmers, 11 thousand hectare area under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.