किल्लारी भूकंपाला ३० वर्षे; बंदुकीच्या फैरी झाडून मृतांना श्रध्दांजली,बाजारपेठ राहणार बंद
By संदीप शिंदे | Published: September 30, 2023 12:29 PM2023-09-30T12:29:03+5:302023-09-30T12:58:24+5:30
किल्लारीकरांनी पाळला काळा दिवस, बाजारपेठ बंद, घराघरांत वाहण्यात आली श्रध्दांजली
किल्लारी : येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना शनिवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील स्मृतिस्तंभाजवळ पोलीस दलाच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीनदा फैरी झाडून श्रध्दांजली वाहिली. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून काळा दिवस पाळला.
शनिवारी सकाळी स्मृतीस्तंभाजवळ विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सुर्यवंशी, नायब तहसीलदार लाला कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राजपुत, अशोक ढोणे, वनविभागाच्या अधिकारी वृषाली तांबे, सचिन रामपुरे, सरपंच युवराज गायकवाड, माजी सभापती किशोर जाधव, सोनवणे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम सुर्यवंशी, बंकट पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धाजंली अर्पण केली.
यावेळी लातूरच्या पोलीस कार्यालयाच्या पथकाने धून वाजवून व हवेत आठ रायफलींच्या तीनदा फायरिंग करुन सलामी दिली. यावेळी तलाठी वाडीकर, विजय उस्तूरे, मंडळाधिकारी शेख, प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, प्रा.डॉ. संजय मोरे, प्राचार्य डी.टी. कांबळे, प्रा. नंदकुमार माने, औंढे, दिपक पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रकाश पाटील, बिसरसिंग ठाकूर, किरण बाभळसूरे, वलीखॉ पठाण, प्रा. हरीचंद्र कांबळे, जयपाल भोसले, व्यंकट मुळजे, सतीश भोसले, श्री नीळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अशोक गावकरे, गुलाब शिंदे, जयश्री कांबळे, हरीचंद्र कांबळे, संजय कोराळे, किशोर भोसले, पांडु गुरव आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
किल्लारीतील बाजारपेठ बंद...
शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून काळा दिवस पाळला. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. बहुतांश घरांमध्ये श्रध्दांजली वाहण्यात येत होती.