किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण

By संदीप शिंदे | Published: September 30, 2024 06:20 PM2024-09-30T18:20:38+5:302024-09-30T18:22:29+5:30

काळा दिवस : स्मृतीस्तंभास्थळी पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रद्धाजंलीची धून वाजवून नऊ पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फैरी झाडून श्रद्धांजली अर्पण केली.

31 years since the Killari earthquake; Paying tribute to the dead by keeping the market closed | किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण

किल्लारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण; काळा दिवस पाळून बाजारपेठ बंद ठेवत आदरांजली अपर्ण

किल्लारी : येथील प्रलयकारी भूकंपाला सोमवारी ३१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काळा दिवस पाळण्यात आला. सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन आदरांजली अर्पण केली. तसेच स्मृत्तीस्तंभाला सकाळी आठ वाजता आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय आधिकारी अविनाश कोरडे, तहसिलदार घनश्याम आडसुळ, औसा बाजार समितीचे शेखर सोनवणे, माजी सरपंच डॉ. शंकरराव परसाळगे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलिस उपनिरिक्षक जळबाजी गायकवाड, सरपंच सुलोचना बाबळसुरे, वैशाली गुंजोटे, व्यापारी आसोसिएशनचे शरद भोसले, युवराज गायकवाड, गोविंद भोसले, पाटील गौरीशंकर बालकुंदे, मंडळ अधिकारी सुरेश गवळी, तलाठी रविंद्र वाडेकर, तलाठी विजयकुमार उस्तुरे, वनपरिक्षेञ अधिकारी डी.एम कोटे, वनपरिमंडळ अधिकारी पी.एस चिल्ले, वनरक्षक मुंडे, शिंदे, काळे आदी उपस्थित होते.

यावेळी शहीद भगतसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य संग्राम मोरे, अशोक गायकवाड, नंदकुमार काळे, नंदकुमार माने, डि.पी. कांबळे, हणमंत पवार, पांडुरंग मगर, श्रीकांत कोणे, धनराज बाबळसुरे, संभाजी बाबळसुरे, ह.भ.प.निलेश महाराज चव्हाण, प्रकाश पाटील, हारुण अत्तार, बिसरसिंग ठाकूर, युनुस लदाफ, हारूण आतार, श्रीकांत कोणे, हणमंत बिराजदार, धनराज बाबळसुरे, पंडीतण्णा गावकरे, सतिश भोसले, हरिश्चंद्र कांबळे, जयश्री कांबळे, बबिता कांबळे आदींसह किल्लारी परिसरातील नागरिक उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून आदरांजली वाहिली.

बंदुकीची फैरी हवेत झाडून श्रद्धांजली...
पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रद्धाजंलीची धून वाजवून नऊ पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फैरी झाडून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बिट जमादार किसन मरडे, आबासाहेब इंगळे, मुरली दंतराव, कृष्णा गायकवाड, धनराज कांबळे,यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रद्धाजंलीची धून वाजवून नऊ पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीचे तीन फैरी झाडून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बिट जमादार किसन मरडे, आबासाहेब इंगळे, मुरली दंतराव, कृष्णा गायकवाड, धनराज कांबळे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 31 years since the Killari earthquake; Paying tribute to the dead by keeping the market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.