उदगीरातील शिबिरात ३६ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:52+5:302021-05-16T04:18:52+5:30
शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ॲड.दत्ता पाटील, मनोज पुदाले यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ...
शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ॲड.दत्ता पाटील, मनोज पुदाले यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विहिपचे विभाग संघटनमंत्री संतोष कुलकर्णी, जिल्हामंत्री विलास खिंडे, सतीश पाटील, प्रखंड मंत्री श्रीपाद करंजीकर, ग्रामीण प्रखंड मंत्री विवेक मदनुरे, बजरंग दल संयोजक निखिल पाटील, सेवा विभाग प्रमुख दिनेश देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पांडुरंग फड, कार्याध्यक्ष गणेश पाटील, अजय नवरखेले, शुभम लोणीकर, बजरंग दलाचे सहसंयोजक आकाश बरिदे, सूरज बिरादार उपस्थित होते.
यावेळी रक्तदात्यांना छत्रपती संभाजी महाराज, समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुस्तिकेची भेट देण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे विहिंपने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. २५ मेपासून शहरातील सर्व कोविड सेंटरमधील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन सेवा व तसेच गरजूंना धान्य किटचे वाटप केले जाणार आहे.