जिल्ह्यात रविवारी आढळले ३८ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:09+5:302021-01-25T04:20:09+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी १४३४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात १९ जणांचा अहवाल पॉझिटिव आला ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी १४३४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात १९ जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. तर ७५०व्यक्तींची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली. त्यातही १९ नवे रुग्ण आढळले आहेत. प्रयोग शाळेतील चाचणीत १९ आणि रॅपिड टेस्टमध्ये १९ असे एकूण ३८ नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल एस देशमुख डॉ.श्रीधर पाठक यांनी दिली. प्रकृती ठणठणीत झाल्याने २५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून त्याची टक्केवारी ९५.८५ टक्के झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.५ असून गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी वाढलेला आहे. लातूर जिल्ह्याला दिलासा आहे. दरम्यान, लसीकरणालाही वेग आला असून आतापर्यंत १६७५ जणांना देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील सहा केंद्रावर लस देण्यात येत आहे.