साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा; ५ ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: June 10, 2023 07:03 PM2023-06-10T19:03:26+5:302023-06-10T19:03:32+5:30
लातूर, बीड, साेलापुरातील ठेकेदारांचा समावेश...
लातूर : जिल्ह्यातील गाेंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात विविध जिल्ह्यातील एकूण पाच ठेकेदारांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, साईबाबा शुगर कारखाना गाेंद्री या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस ताेडणीबराेबरच वाहतूक करण्यासाठी सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी वेळाेवेळी करार करण्यात आला हाेता. दरम्यान, करारानंतर झालेल्या व्यवहारापाेटी कारखान्याच्या वतीने धनादेश, आरटीजीएस आणि ऑनलाईन पद्धतीन पाच उस ताेडणी, वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांना एकूण ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपये देण्यात आले. करारामध्ये नमूक करण्यात आल्याप्रमाणे या पाचही ठेकदाराने उस ताेडणी आणि त्याची वाहतूक न करता साखर कारखान्याची फसवणूक केली.
याबाबत औसा पाेलिस ठाण्यात साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी दत्तात्रय सर्जेराव काेकाटे (वय ४२ रा. मजगे नगर, लातूर) यांच्या तक्रारीवरुन फरीदखान अजिजखान पठाण (रा. हैबतपूर ता. उदगीर जि. लातूर), नवनाथ श्रीपती ढवारे (रा. रायगड नगर, अंबाजाेगाई जि. बीड), आबासाहेब दगडू खरात (रा. खरातवाडी ता. पंढरपूर जि. साेलापूर), वाहतूक उसताेड ठेकेदार धुळाप्पा बिराप्पा गावडे (वडदेगाव ता. माेहाेळ जि. साेलापूर) आणि वाहतूक उसताेड ठेकेदार अजय अशाेक राठाेड (रा. बेलगाव तांडा ता. गेवराई जि. बीड) यांच्या विराेधात गुरनं. २४७ / २०२३ कलम ४२०, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती औसा पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक यू.एस. पटवारी यांनी दिली.