लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही बहुतांश प्रकल्प जोत्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:44+5:302021-08-02T04:08:44+5:30
मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ ...
मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ आहे. निम्न तेरणा प्रकल्प सोडला तर उर्वरित काही प्रकल्प जोत्याखाली, दहा कोरडे आणि काही प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा होणारा महत्त्वाचा प्रकल्प मांजरा धरण असून, या प्रकल्पामध्ये ८७.३५६ पाणीसाठा झाला असून, यातील ४०.२३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता पूर्ण होण्यासाठी १३६.७२८ दलघमी पाणीसाठ्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात ३०.६१ टक्के पाणी उपलब्ध
लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प मिळून १४२ प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ६५५.५३३ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २१२.८९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या उपयुक्त साठ्याची सद्य:स्थितीतील टक्केवारी ३०.६१ आहे.
मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा
तावरजा : ० टक्के
व्हटी : ० टक्के
रेणा : ११.७० टक्के
तिरु : १९ टक्के
देवर्जन : ३०.५९ टक्के
साकोळ : २१.५८
घरणी : ३४.१३
मसलगा : ३७.०५ टक्के