लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही प्रकल्प जोत्याखाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:35+5:302021-08-02T04:08:35+5:30

मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ ...

432 mm in Latur district. Project under construction despite rain! | लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही प्रकल्प जोत्याखाली !

लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही प्रकल्प जोत्याखाली !

Next

मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ आहे. निम्न तेरणा प्रकल्प सोडला तर उर्वरित बाकीचे सर्व प्रकल्प जोत्याखाली म्हणजे कोरडे म्हणायला हरकत नाही. लातूर शहराला पाणीपुरवठा होणारा महत्त्वाचा प्रकल्प मांजरा धरण असून, या प्रकल्पामध्ये ८७.३५६ साठा झाला असून, यातील ४०.२३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता पूर्ण होण्यासाठी १३६.७२८ दलघमी पाणीसाठ्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे.

जिल्ह्यात ३०.६१ टक्के पाणी उपलब्ध

लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प मिळून १४२ प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ६५५.५३३ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २१२.८९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या उपयुक्त साठ्याची सद्य:स्थितीतील टक्केवारी ३०.६१ आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा

तावरजा : ० टक्के

व्हटी : ० टक्के

रेणा : ११.७० टक्के

तिरु : १९ टक्के

देवर्जन : ३०.५९ टक्के

साकोळ : २१.५८

घरणी : ३४.१३

मसलगा : ३७.०५ टक्के

Web Title: 432 mm in Latur district. Project under construction despite rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.