तीक्ष्ण हत्याराने वार करुन ४५ वर्षीय महिलेचा खून; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

By हरी मोकाशे | Published: July 3, 2024 06:28 PM2024-07-03T18:28:31+5:302024-07-03T18:28:45+5:30

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

45-year-old woman killed by stabbing; A case has been registered against both | तीक्ष्ण हत्याराने वार करुन ४५ वर्षीय महिलेचा खून; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

तीक्ष्ण हत्याराने वार करुन ४५ वर्षीय महिलेचा खून; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

किनगाव/ अंधोरी (जि. लातूर) : माझ्या भावाच्या खुनाची माहिती असतानाही सांगत नाही, अशा संशयातून एका ४५ वर्षीय महिलेचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील विळेगाव शिवारात घडली. याप्रकरणी मयत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत दोघांविरुध्द मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारामती कचरु ढगे (४५, रा. विळेगाव, ता. अहमदपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, विळेगावातील अरविंद पंढरी तेलगे यांचा काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने खून केला होता. मयत अरविंद यांचा मित्र आकाश कचरु ढगे होता. त्यावरुन अरविंदचा भाऊ साईनाथ पंढरी तेलगे व कुंटुंबियांनी आकाशकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. परंतु, तो काहीही सांगत नसल्याने त्याला खूनाची माहिती असावी, असा संशय बळावला.

सोमवारी दुपारी आकाशची आई तारामती कचरु ढगे ह्या म्हैस चारण्यासाठी मन्याड नदीशेजारील बालाजी तेलगे यांच्या शेतात गेल्या होत्या. तेव्हा साईनाथ तेलगे व सालगडी बाबू हक्कानी शेख हे तिथे आले. त्यांनी महिलेच्या उजव्या कानाजवळ, कपाळावर व डोक्यावर वार करुन खून केला. दरम्यान, किनगाव पोलिसांना खूनाची माहिती मिळाली. त्यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर, सपोनि. भाऊसाहेब खंदारे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत महिलेचा मुलगा आकाश उर्फ नागार्जुन ढगे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत साईनाथ पंढरी तेलगे व सालगडी बाबू हक्कानी शेख यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपाेनि. भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.

 

Web Title: 45-year-old woman killed by stabbing; A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.