लातूर : एटीएमचा पासवर्ड वापरुन परस्पर ५० हजार लांबविले

By राजकुमार जोंधळे | Published: April 9, 2023 07:19 PM2023-04-09T19:19:14+5:302023-04-09T19:19:25+5:30

याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

50,000 withdrawn using ATM password | लातूर : एटीएमचा पासवर्ड वापरुन परस्पर ५० हजार लांबविले

लातूर : एटीएमचा पासवर्ड वापरुन परस्पर ५० हजार लांबविले

googlenewsNext

लातूर : एटीएममध्ये अडकलेले कार्ड काेणीतरी अज्ञाताने घेऊन, ते दुसऱ्या एटीएम मशीनमध्ये वापरुन, पासवर्ड क्रमांकाचा वापर करून परस्पर ५० हजार रुपये काढून घेतल्याची घटना नळेगाव येथे २ एप्रिल राेजी घडली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शबीर गनीसाब शेख (वय ५७, रा. नळेगाव, ता. चाकूर) हे नळेगाव येथील एसबीआयच्या एटीएमवर गेले हाेते. दरम्यान, पैसे काढण्यासाठी त्यांनी आपले कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यावेळी त्याचे कार्ड हे एटीएममध्ये अडकले.

बराचवेळ झाले ते कार्ड बाहेर आले नाही. हे कार्ड अज्ञात व्यक्तीने घेऊन, फिर्यादीच्या एटीएमचा कार्डचा पासवर्ड वापरुन, ते कार्ड दुसऱ्या एटीएममध्ये वापरुन फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर ५० हजार रुपये काढून घेतले. फिर्यादीने अधिक चाैकशी केली असता, बँक खात्यातील ५० हजार परस्पर गायब असल्याचे आढळून आले. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 50,000 withdrawn using ATM password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.