६१ ग्रामपंचायतींना मिळणार नवे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:17+5:302021-02-05T06:22:17+5:30

४ फेब्रुवारी रोजी अरसनाळ, गुरधाळ, कुमठा खु., चिघळी, दावणगाव, नळगीर, सुमठाणा, मल्लापूर, शिरोळ, हंगरगा, हाळी, ५ फेब्रुवारी रोजी कासराळ, ...

61 Gram Panchayats will get new caretaker | ६१ ग्रामपंचायतींना मिळणार नवे कारभारी

६१ ग्रामपंचायतींना मिळणार नवे कारभारी

Next

४ फेब्रुवारी रोजी अरसनाळ, गुरधाळ, कुमठा खु., चिघळी, दावणगाव, नळगीर, सुमठाणा, मल्लापूर, शिरोळ, हंगरगा, हाळी, ५ फेब्रुवारी रोजी कासराळ, किनी यल्लादेवी, कौळखेड, गुडसूर, चांदेगाव, धडकनाळ, निडेबन, बेलसकरगा, माळेवाडी, हेर, ८ फेब्रुवारी रोजी इस्मालपूर, वाढवणा खु., जकनाळ, लोणी, डोंगरशेळकी, कोदळी, बामणी, मांजरी, लोहारा, शेल्हाळ, हंडरगुळी, रुद्रवाडी, वाढवणा बु., ९ फेब्रुवारी रोजी करडखेल, जानापूर, खेर्डा खु., अवलकोंडा, डांगेवाडी, धोंडीहिपरगा, पिंपरी, बोरगाव, येनकी, होनीहिपरगा, १० फेब्रुवारी रोजी एकुर्का रोड, करखेली, टाकळी, कुमदाळ उदगीर, तादलापूर, हकनकवाडी, मादलापूर, हिप्परगा, ११ फेब्रुवारी रोजी करवंदी, कुमदाळ हेर, गंगापूर, डाऊळ हिप्परगा, लिंबगाव, भाकसखेडा, वागदरी, १२ फेब्रुवारी रोजी क्षेत्रफळ, अडोळवाडी येथील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.

यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून शिवशंकर पाटील, व्यंकटेश दंडे, संभाजी चव्हाण, सुरेश घोके, रवींद्र जाधव, विकास सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, राम कुलकर्णी, संजयकुमार पाटील, चिंतामणी कोकरे, उत्तम केंद्रे, महादेव वाघमारे, राघोबा घंटेवाड, नीळकंठ पवार, विजय आजणे, संजय शिंदाळकर, विवेकानंद स्वामी, सुधाकर आवंडकर, बालाजी धमनसुरे, अल्लाउद्दीन शेख, संजय गुजलवार, यशपाल सातपुते, संतोष चोपडे हे राहणार आहेत.

ग्रामपंचायत सदस्य सहलीवर...

शुक्रवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच काही गावांतील नूतन ग्रामपंचायत सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. वाढवणा, निडेबन, हेरसह अन्य गावांत चुरशीच्या लढती होणार आहेत. बहुतांश गावात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याने ते सरपंच पदावर हक्क सांगत आहेत. ग्रामपंचायतीचा कारभारी नेमका कोण? कोणत्या गटाचा? याची उत्सुकता आता ग्रामस्थांना लागली आहे.

Web Title: 61 Gram Panchayats will get new caretaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.