पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून ६१ लाखांची फसवणूक

By हरी मोकाशे | Published: April 7, 2023 07:05 PM2023-04-07T19:05:44+5:302023-04-07T19:06:16+5:30

पैसे घेऊन पाठवले बनावट प्रमाणपत्र; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

61 lakh fraud by fake promise to providing petrol, CNG pump dealership | पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून ६१ लाखांची फसवणूक

पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून ६१ लाखांची फसवणूक

googlenewsNext

औराद शहाजानी (जि. लातूर) : पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो म्हणून येथील एकाची ६१ लाख १७ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिसांत गुरुवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, आरोपी मनीष अग्रवाल व रवी भल्ला या दोघांनी संगनमत केले. त्यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील अमाेल व्यंकटराव साैदागर यांना तुम्हाला पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो असे सातत्याने सांगितले. विविध बँकांचे खाते क्रमांक देऊन ऑनलाईनरित्या पैसे पाठविण्यास सांगितले. दरम्यान, वॉटस्अपद्वारे सौदागर यांना वारंवार पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपाचे बनावट प्रमाणपत्र पाठवित ६१ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अमोल सौदागर यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलिसांत विविध कलमान्वये गुरुवारी वरील दोघांविरुध्द सपाेनि. पंकज शिनगारे यांनी वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाेलिस निरीक्षक साेंडारे हे करीत आहेत.

Web Title: 61 lakh fraud by fake promise to providing petrol, CNG pump dealership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.