जिल्ह्यात अडीच हजार चाचण्यांमध्ये ६१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:28+5:302021-01-23T04:19:28+5:30
दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने शुक्रवारी ४५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, ...
दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने शुक्रवारी ४५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा ५, समाजकल्याण वसतिगृह कव्हा रोड लातूर २, खाजगी रुग्णालय ५ आणि होम आयसोलेशनमधील २४ अशा ४५ जणांचा समावेश आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ४७३ दिवसांवर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८० टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४७३ दिवसांवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण स्थिर २.९ टक्के आहे. आतापर्यंत ६८३ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट १.७६ टक्के तर रॅपिड अँटीजन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट ४.० टक्के आहे. आतापर्यंत १ लाख ८७ हजार २२१ चाचण्या करण्यात आल्या असून, या चाचण्यांत २३ हजार ८४९ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३.०१ टक्के आहे.