बँक कर्मचा-यांचा संप; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, लातूर जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:55 PM2019-01-08T19:55:50+5:302019-01-08T19:55:59+5:30

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे.

650 Bank employees of Latur district on Strike | बँक कर्मचा-यांचा संप; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, लातूर जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

बँक कर्मचा-यांचा संप; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, लातूर जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

Next

लातूर - सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपात लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांत कार्यरत असलेल्या ६५० कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. परिणामी, मंगळवारी जवळपास १५० कोटींचा व्यवहार ठप्प झाला. 

आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशभरात कामगारांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात बँक कर्मचारीही सहभागी आहेत. लातूर शहरातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर बँक कर्मचाºयांनी मंगळवारी निदर्शने केली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सरकारचे आर्थिक त्याचबरोबर कामगार विषयक धोरण चुकीचे आहे. सध्या बँकिंग उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बँक एकत्रिकरणाच्या माध्यमातून सरकार आपले एकत्रिकरणाचे धोरण राबवीत आहे. याशिवाय, सरकारचा आर्थिक निर्णय निश्चलीकरण, जीएसटी, एफआरडीआय विधेयकामुळे बँकिंग उद्योगात अस्थिरतेचे वातावरण आहे.

बँकिंगमधल्या रिक्त जागांवर कर्मचा-यांची भरती केली जात नाही. सरकार नोकर भरती करण्याऐवजी प्रत्येक काम कंत्राटी पद्धतीने करवून घेत आहे. त्यामुळे हजारो जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात, यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार, बँक कर्मचाºयांनी दोन दिवसीय राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. यावेळी कॉ. प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, महेश गंधले, सचिन एकुरगे, प्रकाश जोशी, आदित्य देशपांडे, परमेश्वर बडगिरे, प्रणाली मेश्राम, राधिका मुंदडा, महेश घोडके, गजानन औटी, रोहित पेंडसे, श्रीकृष्ण मांडे आदींसह विविध संघटनेचे कर्मचारी, कामगार उपस्थित होते. 

व्यवहारावर परिणाम... 
देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे बँकिंग व्यवहारावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत सरासरी ३०० कोटींची उलाढाल ठप्प होईल, अशी माहिती कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली. 

 

Web Title: 650 Bank employees of Latur district on Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक