सभासदांना ७ टक्के लाभांश वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:31+5:302021-09-27T04:21:31+5:30
निलंगा तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव साखरे वाघ होते. ...
निलंगा तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव साखरे वाघ होते. यावेळी कालिदास माने, पंचायत समिती सभापती राधाताई बिरादार यांची उपस्थिती होती.
यावेळी चेअरमन अरुण सोळुंके म्हणाले, ३५ लाख ४० हजारांच्या तोट्या असलेली ही पतसंस्था नफ्यात आणून ३ टक्के, ६ टक्के व यंदा ७ टक्के लाभांश वाटप करण्यात येत आहे. कर्जमर्यादा ५ लाखांवरून १२ लाखांवर करण्यात आली. पाच वर्षांत ११ मयत शिक्षकांचे कर्ज निधी हमी व्याजातून ३३,३२,०३६ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले.
यावेळी संजय कदम, धर्मप्रकाश लखणे, चंद्रकांत पाटील, डी.बी. गुंडुरे, डी.एस. धुमाळ, संजय अंबुलगेकर, पी.जी. सराटे, दीपाली माने, सुनीता रोळे, केशव गंभीरे उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद मठपती यांनी केले. आभार संजय कदम यांनी मानले.