लातूरमध्ये सात लाखांची घरफाेडी; १६ ताेळे दागिन्यासह राेकड लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: October 5, 2023 11:49 PM2023-10-05T23:49:50+5:302023-10-05T23:50:46+5:30
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राजकुमार जाेंधळे, लातूर : किचन रूमच्या दरवाजाचा कडीकाेंडा खिडकीतून काढून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील १६ ताेळे साेन्याचे दागिने, १ लाख ९० हजार असा एकूण ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, डाॅ. कमलाकर प्रभाकरराव लव्हराळे (वय ४८, रा. विशालनगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, फिर्यादीची बहीण सुनीता ईश्वर हावन्ना आणि तिचे पती हे दाेघेही रात्री घरातील सर्व दरवाजे आतून बंद करुन बुधवारी रात्री हाॅलमध्ये झाेपी गेले हाेते. दरम्यान, किचन रूमच्या दरवाजाचा कडीकाेंडा चाेरट्यांनी खिडकीतून काढून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटमध्ये ठेवण्यात आलेले १६ ताेळे साेन्याच्या बांगड्या, पाटल्या (किंमत ४ लाख ८० हजार) आणि १ लाख ९० हजार रुपयांची राेकड असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. याची माहिती एमआयडीसी ठाण्याला दिली. घटनास्थळी लातूर शहर डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घरफाेडीतील चाेरट्यांचा शाेध पाेलिस घेत असल्याचे पाेलिस निरीक्षक दिवे म्हणाले.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. ७४३ / २०२३ कलम ४५७, ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक सचिन द्राेणाचार्य करत आहेत.