सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांना कंपनीचा ८५ लाखांचा गंडा, ३७ जणांना फसवले
By राजकुमार जोंधळे | Published: August 28, 2022 08:12 PM2022-08-28T20:12:14+5:302022-08-28T20:12:48+5:30
३७ शेतकऱ्यांची फसवणूक: अधिक भाव देण्याचे आमिष
लातूर : जिल्ह्यातील एकूण ३७ शेतकऱ्यांना बाजारभावपेक्षा अधिकचा भाव देण्याचे आमिष दाखवत साेयाबीन खरेदीतून एका खाजगी कंपनीने तब्बल ८५ लाखांला गंडविल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सांगितले, शेतकरी जगदीश नरहरी साेमवंशी (रा. माटेगाव ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
एमआयडीसी परिसरात असलेल्या गाेल्डस्टार अॅग्राे इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीकडून साेयाबीन, तूर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार शेतकऱ्यास मिळाली. त्यांनी ११ जुलै २०२२ राेजी तक्रारदार आणि त्यांचा शेतकरी मित्र श्रीधर रावसाहेब जाधव यांनी आपले साेयाबीन विक्री केले. त्यामध्ये जगदीश साेमवंशी आणि श्रीधर जाधव यांनीही सोयाबीनची विक्री केली आहे. दरम्यान, बाजार भावापेक्षा अधिकचा भाव देण्याचे सांगितले होते. तर विक्री केलेल्या साेयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांचा भाव देणार असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना एका बॅकेचा धनादेशही देण्यात आला होता. तर अतिक युसूफ शेख यांच्यासह यांच्यासह अन्य दाेघे तक्रारदारांच्या गावामध्ये आले हाेते. जिल्ह्यातील ३७ शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे समाेर आले. चाैकशी केले असता एमआयडीसी परिसरातील गाेदाम बंद हाेते. विविध गावातील अनेक शेतकऱ्यांनी अधिक भाव मिळणार असल्याच्या आमिषाला बळी पडत आपले साेयाबीन विक्री केलेले हाेते. मात्र, पैशासाठी संबंधितांचा शाेध घेतला असता, ते आढळून आले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीने एकूण ३७ शेतकऱ्यांना तब्बल ८५ लाख १५ हजार ३४५ रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अतिक युसूफ शेख याच्यासह अन्य दाेघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक डाके करत आहेत.
फसवणुकीची व्याप्ती वाढेल
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरु केला आहे. अधिकचा भाव देताे म्हणून शेतकऱ्यांना फसवल्याचा प्रकार घडला आहे. या फसवणुकीच्या घटनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. आराेपी ताब्यात घेतल्यानंतरच गुन्ह्याची इतर माहिती हाती लाणार आहे, असे पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले.