जिल्ह्यातील ८७३ गावे कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:43+5:302021-07-07T04:24:43+5:30
चाकूर तालुक्यात ८२ गावे असून, त्यापैकी ७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. देवणी तालुक्यात ५२ गावे असून, ५१ गावे कोरोनामुक्त ...
चाकूर तालुक्यात ८२ गावे असून, त्यापैकी ७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. देवणी तालुक्यात ५२ गावे असून, ५१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जळकोट तालुक्यामध्ये ४८ गावांची संख्या असून, ४६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत, तर दोन गावांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रेणापूर तालुक्यात ७९ गावांची संख्या आहे. त्यापैकी ७२ गावे कोरोनामुक्त झाली असून, सात गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. निलंगा तालुक्यात १५० गावांची संख्या आहे. त्यापैकी १४१ गावे कोरोनामुक्त झाली असून, नऊ गावांमध्ये काही रुग्ण आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये ४८ गावांपैकी ४७ गावे कोरोनामुक्त झाली असून, एका गावामध्ये बाधित रुग्ण आहेत. लातूर तालुक्यात १२१ गावांपैकी १०७ गावे कोरोनामुक्त झाली असून, आणखी अकरा गावे कोरोनामुक्त होणे बाकी आहे.
उदगीर तालुक्यात ९८ गावे असून, ९४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. चार गावे कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात एकूण ९२८ गावांपैकी ८७३ गावे कोरोनामुक्त झाली असून, ५५ गावांमध्ये बाधित रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.