गतवर्षीच्या तुलनेत ९१़०३ मि.मी. ने पाऊस कमी
By Admin | Published: September 16, 2015 12:25 AM2015-09-16T00:25:51+5:302015-09-16T00:33:04+5:30
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ३४३़९२ मि.मी. पाऊस झाला असून, मागील २४ तासात १३़९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे़ गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ३४३़९२ मि.मी. पाऊस झाला असून, मागील २४ तासात १३़९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे़ गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३४़९५ मि.मी. इतका पाऊस झाला होता़ तुलनेने यंदाचा पाऊस ९१़०३ मि.मी. ने कमी आहे़ दरम्यान, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात आधुन-मधून पाऊस सुरु असला तरी ८ मध्यम प्रकल्पापैकी २ मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत़ त्यात रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील धरणी प्रकल्पाचा समावेश आहे़ मांजरा प्रकल्पात ५़०८३ तर निम्न तेरणा प्रकल्पात ८़१६६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात ८७़५८, जुलै महिन्यात ३३़२०, आॅगस्ट महिन्यात १०१़७७ आणि १६ सप्टेंबर पर्यंत १२१़३८ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यंदा सरासरी आजपर्यंत ३४३़९२ मि़मी़ पाऊस झाला आहे़ तर गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३४़९५ मि़मी़ इतका पाऊस झाला होता़ जून महिन्यात ५२़११ मि़मी़ जुलै महिन्यात ११९़०२, आॅगस्टमध्ये २००़९४ मि़मी़ आणि १६ सप्टेंबर पर्यंत ४१़११ मि़मी़ इतका पाऊस झाला होता़ यंदा तुलनेने हा पाऊस ९१़०३ मि़मी़ने कमी आहे़ त्यामुळे रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी प्रकल्प कोरडाच आहे़
मांजरा प्रकल्पात मात्र पाण्याचा फ्लो हळूहळू वाढत असून, लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात ०़९२८, रेणापूर ३़६५२, उदगीर तालुक्यातील तिरुमध्ये ५़४९०, देवर्जनमध्ये १़४९२, साकोळ प्रकल्पात ०़८७३, निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पात ०़१५९ पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ गेल्या आठवड्यापासून हलका पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा फ्लो हळूहळू वाढत असल्याने दिलासा मिळत आहे़ (प्रतिनिधी)