९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; न्याहारीला सुशीला, जेवणात भोकरी-वरण, रातच्याला मिळणार समद्यांनाच ‘धपाटे’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 01:22 PM2022-04-20T13:22:55+5:302022-04-20T13:23:25+5:30

उदगीरात येत्या २२ तारखेपासून होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन दिवसांचे मेन्यू कार्ड भोजन समितीचे शिवशंकर हल्लाळे यांनी दाखवून एक-एक पदार्थ वेगळा कसा हे सांगितलं.

95th All India Marathi Literary Convention; Sushila for breakfast, Bhokari-dal for lunch and Dhapate for dinner | ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; न्याहारीला सुशीला, जेवणात भोकरी-वरण, रातच्याला मिळणार समद्यांनाच ‘धपाटे’

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; न्याहारीला सुशीला, जेवणात भोकरी-वरण, रातच्याला मिळणार समद्यांनाच ‘धपाटे’

googlenewsNext

व्ही. एस. कुलकर्णी -

उदगीर (जि. लातूर) :
उदगीरकर खाण्यात अन् खाऊ घालण्यात लई भारी... सुशीला खाल्ल्याशिवाय उदगीरकरांची न्याहारीच नाही. इथल्या भोकरी-वरणाला तर तोडच नाही. धपाटे अन् दही खाल तर काय भारी हो, असंच म्हणाल. उदगीरची हीच खास मेजवानी आता साहित्यिकांच्या जिभेवर तीन दिवस अधिराज्य गाजवणार आहे. हा मेन्यू खाल्ल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘लई भारी हो... मायच्यान ही आठवण इसरणार नाही आम्ही.’

उदगीरात येत्या २२ तारखेपासून होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन दिवसांचे मेन्यू कार्ड भोजन समितीचे शिवशंकर हल्लाळे यांनी दाखवून एक-एक पदार्थ वेगळा कसा हे सांगितलं. तुम्ही सर्वत्र सगळं खातावच हो, पण इथली चव चाखल्यावर खवय्ये उदगीरकर काय चीज आहेत, हे पावण्यांना दिसंल. इथली पुरणपोळी तुम्ही खाऊनच बगा. राजाराणी मिठाई अन् केशरी जिलेबी गोडवा वाढवायला हाय.

पयल्या दिवशी स्पेशल पांढरा उपमा, पोहे अन् केळीचा असंल. दुपारच्याला फुलके, मसाला पुरी, वरण-भात, दोडका-मूगडाळीची भाजी, स्पेशल मिक्स भाजी, वरण-भात वरून राजाराणी मिठाई. राती ज्वारीच्या भाकरीसंगं भोकरी डाळ असंल. मेथीचा झुणका, मटकीची उसळ तर दुसऱ्या दिवशीच्या न्याहारीला साऊथ इंडियन इडली, वडा-सांबर अन् ज्यांना लागंल त्यांना शाबुदाणा खिचडी.. जेवणात पुरी, बेसनाची वडी, वरणभात, बटाट्याची भाजी आणि केशर जिलबी. रातच्या जेवणात उदगीर स्पेशल धपाट्याला कढीची सोबत राहील. संगट (सोबतीला) शेवभाजी, चवळीची भाजी, रातीच्या जेवणात दालफ्राय, मुगाची भीज, भेंडीची भाजी, जिरा राईस, गव्हाची खीर राहील. तिसऱ्या दिवशीच्या मेन्यूत थालीपीठाच्या मेजवानीसह इतरही नवी टेस्ट सगळ्याना मिळंल.’ 

एकदा खाल तर पुना उदगीरला याल... 
nशेतातील राशी आटोपल्या की केली जाणारी भोकरी डाळ. अनेक मसाल्यांचे मिश्रण असलेली ही डाळ अनेक जण भाकरीसोबत कुस्करून वरपून खातात. कांदा, लिंबू असतोच संगट. मुरमुरे पाण्यात भिजवून लगीच काढल्यानंतर पोह्यासारखीच रेसिपी करून फोडणी देणे हा स्पेशल प्रकार. 

- उदगिरातील हॉटेलमध्ये सुशीला मिळतोच. इथले धपाटेही एकदम  हटके. आठवडाभर, महिनाभर टिकणारे धपाटेही उदगीरमध्ये मिळतात. तशीच इथली कडक भाकरीही महिनाभर टिकते. दह्यासोबत धपाटे 
खाल तर उदगीरचे धपाटे... काय होते हो, ही आठवण तुम्ही कायम स्मरणात ठेवाल.
 

Web Title: 95th All India Marathi Literary Convention; Sushila for breakfast, Bhokari-dal for lunch and Dhapate for dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.