लातूर विभागीय मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:29+5:302021-07-17T04:16:29+5:30
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय ...
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. मूल्यमापन केलेल्या १ लाख १० हजार ३४२ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार २८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी - १ मध्ये ३९ हजार ६३७, श्रेणी - २ मध्ये ४ हजार ७३०, पास श्रेणीत ४ हजार १८६ असे एकूण १ लाख ९ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार, निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय व वर्गशिक्षक यांनी केलेल्या मूल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ४० हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार २७७ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले. या मूल्यमापनात २२ हजार ८०६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर श्रेणी - १ मध्ये १४ हजार १९१, श्रेणी - २ मध्ये २ हजार ७, पास श्रेणीमध्ये १ हजार ११८ असे एकूण ४० हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६१ टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. या मूल्यांकनात १२ हजार ४४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये ८ हजार ५७, श्रेणी - २ मध्ये १ हजार ३२४ तर पास श्रेणीत ७८० असे एकूण २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४२ टक्के आहे.
नांदेड जिल्ह्यात ४७ हजार ३३८ विद्यार्थ्यांची नोंदणी मूल्यांकनासाठी झाली होती. प्रत्यक्ष मूल्यांकन ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे झाले. या मूल्यांकनात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये १७ हजार ३८९, श्रेणी - २ मध्ये १ हजार ३९९ आणि पास श्रेणीत २ हजार २८८ असे एकूण ४७ हजार ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे.